‘१४ जूनला सुशांतसोबत काय झालं होतं?’..बहिण श्वेताची पोस्ट व्हायरल

सुशांत-श्वेता
सुशांत-श्वेता

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा स्मृतीदिन आहे. आजच्या दिवशी २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले होते. त्याचा मृतदेह बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आजा त्याची बहिण श्वेता सिंह कीर्तिने सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या बहिणींसोबत मस्ती करताना दिसत आहेत. दुसरा व्हिडिओ सुशांतचा प्रेयर मीटचा आहे. श्वेताने पोस्ट करून इमोशनल नोट लिहिली आहे.

अधिक वाचा –

श्वेताने कॅप्शनमध्ये काय लिहिलं?

"भाऊ, तू आम्हाला सोडून गेलास ४ वर्षे झाली, आणि आम्हाला आजदेखील माहिती नाही की, १४ जून, २०२० रोजी काय झालं होतं? तुमचा मृत्यू एक रहस्य बनलं आहे. मी असहाय्य अनुभव करत आहे. सत्यासाठी अनगणितवेळी अधिकाऱ्यांकडे गेली आहे. मी धैर्य सोडत आहे. हार मानण्याचे मन करत आहे. पण आज पुन्हा एकदा शेवटचं, मी त्या सर्वांना विचारू इच्छिते की, जे या प्रकरणात मदद करू शकतात. आपल्या मनावर हाथ ठेवा आणि स्वत:ला विचारा, आम्ही हे जाणून घेण्याचे हक्कदार नाही आहे का, आमचा भाऊ सुशांतसोबत काय झालं होतं? हा एक राजकीय अजेंडा का बनला आहे?….कृपया, मी आवाहन करते आणि विनंती करत आहे की, एक परिवाराच्या रूपात आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करा."

अधिक वाचा –

सुशांतबद्दल या गोष्टी जाणून घ्या

सुशांतचा जन्म २१ जानेवारी, १९८६ रोजी पटनामध्ये झाला होता. पाच भाऊ-बहिणींमध्ये तो सर्वात लहान होता. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिवार पटनाहून दिल्ली आले. सुशांतने २००३ मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या एन्ट्रेंस एक्झाममध्ये संपूर्ण देशात सातवीं रँक मिळवली होती. त्याला डान्स खूप आवडायचा. आपल्या डान्स क्लासची फी भरण्यासाठी त्याने मुलांचा क्लासदेखील सुरु केला.

अधिक वाचा –

२००५ मध्ये सुशांतला ५१ व्या फिल्मफेयर ॲवॉर्ड सेरेमनीमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स करण्याची संधी मिळाली. २००६ मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. चित्रपट 'धूम २' मेध्ये तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसला.

सुशांतने करिअरची सुरुवात २००८ मध्ये स्टार प्लस सीरियल 'किस देश में है मेरा दिल' मधून सुरु केला. पण लोकप्रिय शो 'पवित्र रिश्ता' मधून त्याला ओळख मिळाली. बॉलीवूडमध्ये २०१३ मध्ये 'काय पो चे' मधून डेब्यू केला. पुढे 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके', 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ' आणि 'छिछोरे' यासारखे चित्रपट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news