पंचायत थ्री फेम जितेंद्रच्या ‘कोटा फॅक्टरी ३’ चा ट्रेलर रिलीज | पुढारी

पंचायत थ्री फेम जितेंद्रच्या 'कोटा फॅक्टरी ३' चा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : धमाकेदार ‘पंचायत ३’ या वेबसीरीजमधील सचिवजीची मुख्य भूमिका खूपच गाजली. सचिवजी म्हणजे, अभिनेता जितेंद्र कुमार होय. या धमाकेदार वेबसीरीजनंतर जिंतेद्रचा आणखी एक ‘कोटा फॅक्टरी ३’ ही बेवसीरीज ओटीटीवर घेवून येत आहे. नुकतेच या वेबेसीरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांना वास्तवाचे दर्शन घडले आहे. जेईई (JEE) आणि नीट (NEET) सारख्या परीक्षा आणि त्याला सामोरे जाताना विद्यार्थाची होणारी तारेवरची कसरत दाखविली आहे.

ट्रेलरच्या सुरूवातीला ‘यशाची तयारी नाही तर तयारीच यश आहे’ अशा व्यक्तव्याने होते. यानंतर पुढे कोटा येथील जीतू भैया म्हणजे, जितेंद्र कुमार कॉलेजमध्ये शिकवताना दाखवलेले आहेत. याच दरम्यान त्यांना एका मॅडम तुम्ही मुलाचे भैयऐवजी सर का होवू शकत नाही असा प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर जीतूने दिलं आहे.

जेईई (JEE) आणि नीट (NEET) या परिक्षा कडी मेहनत घेताना ती १५-१६ वर्षाची मुलं असतात ही गोष्ट आपण विसरतो. टिचर रागावले तर मुले नाराज होतात. बाहेरील जगाचे ज्ञान नसते, एकमेंकाचे ऐकून वागत असतात, त्याच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, मुले प्रत्येक गोष्ट गंभीर घेतात. यासगळ्याची जबाबदारी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून जीतू सर घेवू शकत नाही तर ती जबाबदारी जीतू भैयाचं घेवू शकतो.
पहिल्यांदा जिथे मुलांना शोधून यशस्वी बनविले जात होते, तेथे आज कोटा फॅक्ट्री बनली आहे. सगळ्या ठिकाणी स्पर्धा वाढली आहे. मुलांची याकडे कल आहे. आणि शेवटी रिझल्टची उत्सुकता असते, या सगळ्यातून विद्यार्थाना जावे लागते असे दाखविले गेलं आहे.

‘कोटा फॅक्टरी ३’ ही वेबसीरीज ब्लॅक अॅन्ड व्हाइट असून विद्यार्थांच्या अवतीभोवती फिरते. सीरिजमधील जीतू भैया या पात्राचं काम एका मेंटॉरचं आहे. जितेंद्र कुमारसोबत या वेबसीरीजमध्ये मयूर मोरे, रेवती पिल्लई, अहसास चन्ना, रंजन राज, आलम खान आणि राजेश कुमार हे कलाकार आहेत. प्रतीश मेहताने ‘कोटा फॅक्ट्री ३’ या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा 

Back to top button