गाभ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार सायली बांदकर

सायली बांदकर
सायली बांदकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सायली बांदकर ही अभिनेत्री 'गाभ' या मराठी चित्रपटातून मोठ्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शॉर्टफिल्म्स, अल्बम आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर सायली आता रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाली आहे. २०१७ च्या सवाई एकांकिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच पारितोषिक पटकावणारी, हेमोलिम्फ, आय आम वूमन, मिसिंग जॅक यासारख्या हिंदी शॉर्टफिल्मसमध्ये केमिओ करणारी तसेच यदाकदाचित, अलबत्या गलबत्या या नाटकांमधून झळकलेली सायली 'गाभ' चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

अधिक वाचा –

चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सायली सांगते की, 'वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका मला 'गाभ' या चित्रपटात साकारायला मिळाली आहे. फुलवा ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. गावखेड्याची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाची कथा रेड्याभोवती फिरते. प्राण्यांशी माझी फारशी जवळीक नाही. मात्र या चित्रपटानंतर माझ्यात प्राण्यांबाबत वेगळी आत्मीयता निर्माण झाली. आपण जे बोलतो ते प्राण्यांना समजतं. त्यांना सांभाळताना कोडिंग किंवा काही टेक्निक लक्षात घेतलं की, आपली त्यांच्यासोबत गट्टी होऊ शकते. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल.

अधिक वाचा –

चित्रपटाबाबत सायली म्हणाली की, 'गाभ' हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे. या चित्रपटाने मला नवी वाट दाखवली. कैलास यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. यापुढे एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.

अधिक वाचा –

'गाभ' चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईमलॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. २१ जूनला 'गाभ' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news