‘संपत्तीवरून वाद टोकाला’…अभिनेत्री लैला खान हत्याकांडात नेमकं काय घडलं? | पुढारी

'संपत्तीवरून वाद टोकाला'...अभिनेत्री लैला खान हत्याकांडात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री लैला खान हत्याकांडातील आरोपी परवेझला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात परवेझ टाक दोषी ठरला असून त्याला मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. २०११ च्या खून प्रकरणी परवेजवर सावत्र मुलगी लैला खानसह तिची आई आणि चार भाऊ-बहिणींचा खून करण्याचा आरोप होता.

परवेज टाक हा अभिनेत्रीचा सावत्र पिता

परवेज टाकला आयपीसी अंतर्गत हत्या आणि पुरावे नष्ट करणेसह इतर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला. परवेज टाक हा अभिनेत्री लैलाची आई सेलिना हिचा तिसरा पती होता. लैला, आई सेलिना आणि तिचे चार भाऊ-बहिणींची इगतपुरीतील एका बंगल्यात खून झाला होता. रिपोर्टनुसार, टाकचे सेलिनाच्या संपत्तीवरून वाद झाला होता. त्याने सर्वात आधी तिचा खून केला. या खुनाच्या काही महिन्यांनंतर परवेझ टाकला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

हेदेखील वाचा-

लैला खान हत्याकांडात नेमकं काय घडलं?

त्याने फेब्रुवारी २०११ मध्ये लैला आणि त्याच्या आईसह सहा लोकांची हत्या करून सर्वांचे मृतदेह इगतपुरीमध्ये लैलाच्या फार्महाऊसमध्ये गाडले होते. आता या हत्याकांडात कोर्टाने आरोपी परवेज इकबाल टाकला दोषी ठरवले. डीएनए परीक्षणानंतर हाडाच्या सापळ्यांची ओळख झाली होती. टाकने तथाकथित चौकशीत पोलिसांना सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीची दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीकता आवडायची नाही.

लैला खान आणि तिची आई शेहलिना खानसह तिच्या परिवारातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार लैलाचे वडील आणि पिता आणि तिच्या आईचे पहिले पती नादिरशाह पटेलने दिली होती. त्याने शेहलिना खान (५९), मोठी मुलगी अजमीना पटेल (३२), दुसरी मुलगी लैला (३०), जुळी मुले जारा आणि इमरान (२५) आणि एक अन्य नातेवाईक रेशमा सगीर खान उर्फ ​​टल्ली (१९) यांचा खून करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये गाडले होते.

हेदेखील वाचा- 

परवेझने आधी पत्नीला मारले, मग मुलांची केली हत्या

ही घटना फेब्रुवारी, २०११ ची आहे. मुंबईतील इगतपुरी येथील बंगल्यात परवेज टाकचे सेलिनासोबत संपत्तीचा वाद झाला होता. पोलिस तपासात समोर आले की, टाकने आधी आपली पत्नी सेलिनाची हत्या केली. त्यानंतर त्याने लैला आणि तिच्या चार भाऊ-बहिणींची हत्या केली होती.

सेलिनाची दुसरी पती आसिफसोबत जवळीकता आवडायची नाही

पोलिसांचे म्हणणे होते की, टाकला वाटायचं की, सेलिना आणि तिच्या परिवाराने त्याच्यासोबत एका नोकरासारखी वागणूक दिलीय. त्याला हादेखील संशय होता की, सेलिना आणि तिचा परिवार दुबईत शिफ्ट होईल आणि त्याला भारतातच सोडून देतील. सेलिनाने परवेज टाकला सांगितलं होतं की, ती आसिफ शेखच्या संपत्तीच्या देखभालीची जबाबदारी सोपवणार होती. त्यासाठी पॉवर ऑफ ॲटर्नीदेखील तयार केली होती. याशिवाय, सेलिनाची तिचा दुसरा पती आसिफ शेखसोबत वाढती जवळीकता परवेजला आवडत नव्हती. या कारणांनीच त्याने सर्वांच्या हत्येचा प्लॅन बनवला. त्याने लैला आणि अन्य सदस्यांची यासाठी हत्या केली की, त्यांनी परवेजला सेलिनाची हत्या करताना पाहिलं होतं.

हेदेखील वाचा- 

कोण होती लैला खान?

लैला खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात २००२ मध्ये कन्नड चित्रपट ‘मेकअप’मधून केली होती. पण, खरी ओळख राजेश खन्ना स्टारर चित्रपट ‘वफा : ए डेडली लव्ह स्टोरी’ मधून मिळाली. हा चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटदेखील सुपरफ्लॉप ठरला होता. या चित्रपटाची चर्चा त्यातील बोल्ड दृश्यांमुळे झाली होती. राजेश खन्ना आणि लैला खान यांच्यात अनेक बोल्ड दृश्य या चित्रपटात होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लैला सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करू लागली.

Back to top button