BanLipstick : तेजस्विनी पंडीतच्‍या ‘लिपस्‍टिक ‘बॅन’मुळे चाहते संभ्रमात

BanLipstick : तेजस्विनी पंडीतच्‍या ‘लिपस्‍टिक ‘बॅन’मुळे चाहते संभ्रमात
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडीत कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असते. सध्‍या तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रिल्सची चर्चा सोशल मीडियावर आहे.यामध्ये  तिने म्‍हटलंय की,  "मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही,  बॅन लिपस्‍टिक" पोस्टमध्ये तिने  #BanLipstick असा हॅशटॅगही दिला आहे. तिच्या या रिलने सोशल मीडिया युझर्सना संभ्रमात पाडले आहे.
लावायची होती तर पुसलीच कशाला? 
तेजस्विनी पंडीतच्या या रिल्सवर सोशल मीडिया युझर्सनी कॉमेंट्स केल्या आहेत. लावून का पुसायची? (BanLipstick ) हातात घ्यायची आणि मी नाही लावणार म्हणायचं, हे पहा एक तर सरळ सांगा कुठलं तरी प्रमोशन आहे का? असा सवाल एकाने केला आहे. एखादा नवीन चित्रपट येत असेल, प्रमोशन साठी काहीपण, बर मग आम्ही काय करु, काय झालं कुणी सांगेन का आणि लिपस्टिक बॅन करायचीय तर ओठावर न लावता व्हिडिओ बनवता आला असता, असेही एकाने म्‍हटलं आहे.
लिपस्टिक मुळे सौंदर्यात भर पडते म्हणून का…! आधी कशाला लावली???,  आणि लावायची होती तर पुसलीच कशाला??? काहीही करतात लोकं, अगदी योग्य निर्णय, नैसर्गिक सौंदर्य हेच खरे, आता तूमचे चित्रपट आता लिपस्टीक न लावता होणार का?, अशी विचारणा एका युझर्नने केली आहे.
BanLipstick नक्की काय झालं असेल तिच्यासोबत..?
तेजस्विनीच्या या लिपस्टीक बॅन रिल्सने चाहत्यांना प्रश्न पडलेत आणि नेमकं काय झाले असावे याबद्दल उत्सुकता लागली आहे.  काय झाल ते तर पूर्ण सांगा… नुसतं बॅन ती का म्हणतेय, ताई विषय काय आहे?, पण का?, तेजस्विनी पंडितने का घेतला असेल हा निर्णय??, नक्की काय झालं असेल तिच्यासोबत..? हा तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे लिपस्टिक लावायची का नाही, तेजस्विनी असं का म्हणतेय…? तुला कोण जबरदस्ती केली का? अशा कॉमेंट्स येत आहेत.

सोनाली खरेचा तेजस्विनीला सपोर्ट 

अभिनेत्री सोनाली खरेनेही आपल्या इन्स्टाग्रामवर मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टीक… असं म्हणतं रिल शेअर केले आहे. आणि पोस्टमध्ये तिने माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक! I Support Tejaswini Pandit #BanLipstick असे तिने लिहलं आहे.
तेजस्विनी पंडीतने आतापर्यंत आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. तिचं हे रिल तिच्या एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन असावं ,अशी शक्यताही चाहते व्यक्त करत आहेत.

पाहा व्‍हिडिओ : जेव्‍हा एक हुजर्‍या शाहू महाराजांना सर्वांसमक्ष रागावताे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news