Pushpa 2 : पुष्पा 2 द रुलचे पहिले गाणे ‘पुष्पा पुष्पा’चा प्रोमो आऊट, रॉकस्टार डीएसपीचे म्युझिक | पुढारी

Pushpa 2 : पुष्पा 2 द रुलचे पहिले गाणे 'पुष्पा पुष्पा'चा प्रोमो आऊट, रॉकस्टार डीएसपीचे म्युझिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पहिल्या सिंगल ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. (Pushpa 2) देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे यात शंका नाही. ‘पुष्पा: द राईज’चे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता या गाण्याची मज्जा अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. (Pushpa 2)

“पुष्पा पुष्पा” हे पूर्ण गाणे 1 मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत. रॉकस्टार डीएसपीच्या व्यस्त म्युझिकल लाइनअपबद्दल बोलत असताना यंदाच्या वर्षी ते उत्तम प्रोजेक्ट्स करणार आहेत.

रॉकस्टार डीएसपी
रॉकस्टार डीएसपी

15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा 2: द रुल’ व्यतिरिक्त डीएसपीकडे सुर्या स्टारर ‘कंगुवा’, राम चरणचा पुढचा, ज्याचे तात्पुरते शीर्षक ‘आरसी 17’ आहे, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजित आहे. कुमार स्टारर ‘गुड बॅड अग्ली’, धनुषचा ‘कुबेरा’ आणि नागा चैतन्यचा ‘थंडेल’ असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

Back to top button