Nach Ga Ghuma : शर्मिष्ठा राऊत-मुक्ता बर्वे स्टारर चित्रपट ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर प्रदर्शित | पुढारी

Nach Ga Ghuma : शर्मिष्ठा राऊत-मुक्ता बर्वे स्टारर चित्रपट ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्र : ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर रिलीज झाला. मोलकरीण व तिच्या मालकिणीची रंजक कथा यात गुंफण्यात आलीय. घरातील कामवाली ज्या गोष्टी लिलया करते, त्या करताना आपली कशी त्रेधा तिरपीट उडते आणि घराचा कसा विचका उडतो, ( Nach Ga Ghuma ) या गोष्टी या ट्रेलरमधून समोर येतात. ( Nach Ga Ghuma )

महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे ‘नाच गं घुमा’ कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की सगळ्यांना ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. “महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे,” ते म्हणतात.

 

 

Back to top button