सिद्धेश-रुचिता- फुलवा खामकर
सिद्धेश-रुचिता- फुलवा खामकर

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन : गुरुजींनी दिलेले घुंगरु फुलवा खामकरने रुचिता-सिद्धेशला दिले भेट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाच्या मंचावर भावूक क्षण पाहायला मिळाला. आपली कला सादर करणाऱ्या रुचिता आणि सिद्धेश या जोडीने यावेळेच्या भागात लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्यावर सुंदर सादरीकरण करुन परिक्षकांची वाहवा मिळवली. सिद्धेश आणि रुचिताच्या या परफॉर्मन्सवर खूष होऊन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि कॅप्टन फुलवा खामकर यांनी त्यांच्या गुरुंनी दिलेले खास घुंगरु भेट म्हणून दिले. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावरचा हा अतिशय भावूक क्षण होता.

सिद्धेश आणि रुचिताने सादर केलेल्या या लावणीने उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. पोटापेक्षा कलेसाठी नाचणाऱ्या विठाबाई गरोदर असतानाही मंचावर नाचल्या, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठाबाईंनी मुलीला जन्म दिला. बाळाची नाळ दगडाने ठेचून त्या पुन्हा स्टेजवर आल्या आणि पुन्हा नाचायला लागल्या. अशी ही लोककलावंत होणे नाही. विठाबाईंच्या जीवनचरित्राची एक छोटीशी झलक मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावर पाहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news