Salman Khan : चाहत्यांना भेट; ‘ईद’निमित्त सलमानची नव्या चित्रपटाची घोषणा | पुढारी

Salman Khan : चाहत्यांना भेट; 'ईद'निमित्त सलमानची नव्या चित्रपटाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ( Salman Khan ) ईदच्या निमित्ताने आगामी आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नव्या ‘सिकंदर’ या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना ईदमिनित्त मोठी भेट दिली आहे. यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता सलमान खान, प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए. आर यांनी आगामी ‘सिकंदर’ चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत. नुकतेच सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या नावाचे एक पोस्टर शेअर केलं आहे. खास करून आजच्या दिवशी ईदच्या मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केल्याने चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करताना सलमानने लिहिले आहे की, ”यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ बघा आणि पुढच्या ईदला येऊन ‘सिकंदर’ ला भेटा. सर्वांना ईदच्या शुभेच्छा.” यावरून पुढच्या वर्षी ॲक्शनने भरलेला ”सिकंदर” हा चित्रपट येत असल्याचीही माहिती मिळतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Back to top button