Salaar २ : प्रभासच्या ‘सालार २’ बाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार रिलीज | पुढारी

Salaar २ : प्रभासच्या 'सालार २' बाबत मोठी अपडेट; 'या' दिवशी होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हा नुकतेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सिनेमा गृहात रिलीज होणार आहे. यानंतर आता अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. दरम्यान त्याने त्याच्या आगामी ‘सालार २’ ( Salaar २ ) या चित्रपटाच्या रिलीज डेट आणि आगामी नियोजनाबाबत मोठी अपडेटस् दिली आहे. यामुळे ‘सालार २’ मध्ये साऊथ स्टार प्रभासला पाहण्यास चाहत्याची उत्कंठा वाढली आहे.

संबंधित बातम्या   

‘सालार’ च्या यशानंतर दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘सालार’ चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला. ‘सालार’ चित्रपटात पृथ्वीराजने खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘सालार’ हा चित्रपट दोन मित्रांच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मित्रांच्या भूमिकेत दिसले होते. सुरुवातीला दोघेही चांगले मित्र असतात, मात्र, नंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा येतो आणि दोघेही एकमेंकाचे शत्रू बनतात असे दाखवले आहे. दरम्यान ‘सालार २’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

पृथ्वीराज सुकुमारन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगतले की, ”साऊथ अभिनेता प्रभास आणि माझा आगामी ‘सालार २’ चे शूटिंग या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. ‘सालार २’ ची ( Salaar २ ) घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘सालार २’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे, २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत. होम्बले फिल्म्स या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती करणार आहे. दिग्दर्शक प्रशांत नील या चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप चांगले लोकेशन शोधण्यात बिझी आहेत. माझ्या ‘L2: Empuraan’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यापूर्वी ‘सालार २’च्या काही भागांचे मी शूटिंग पूर्ण करेन.”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाबाबत पृथ्वीराजने सांगितले की, “जेव्हा मला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची स्क्रिप्ट मिळाली, तेव्हा माझ्या मनात एक भिती होती की, दोन्ही चित्रपटाच्या रिलीज होण्याची एकच तारीख ठरली तर खूपच गोंधळ होईल. मात्र, दिग्दर्शक प्रशांत याच्यासोबत २० मिनिटे चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर सल्ला दिला की, दोन्ही चित्रपट कदाचित वेगवेगळ्या तारखेला रिलीज होतील. यांनतर मी होकार दिला”

प्रभासच्या ‘सालार’चे जगभरात बॉक्स ऑफिस कलेक्शन ६१७ कोटी रुपये झाले आहे. यानंतर ‘सालार २’ ची भरघोष कमाई होईल अशी अपेक्षा आहे. चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Back to top button