रॉकी और राणी येणार 2023 च्या व्हॅलेंटाईनमध्ये | पुढारी

रॉकी और राणी येणार 2023 च्या व्हॅलेंटाईनमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या ‘गली बॉय’ चित्रपटातील यशस्वी जोडीला करण जोहरने त्याच्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’मध्ये रिपिट केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे 50 दिवसांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यानिमित्त बिहाईंड द सीन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे तसेच या चित्रपटाची रीलिज डेटही घोषित करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी दर्शकांना 15 महिने वाट पाहावी लागणार आहे.

2023 च्या व्हॅलेंटाईनवेळी 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, व्हिडीओत रणवीर आणि आलियाची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे ‘कभी खुशी कभी गम’मधील एका सीनचीही आठवण येते. कारण जया बच्चन यात पूजेचे ताट हातात धरलेल्या दिसून येतात. चित्रपटात शबाना आझमी, धमेंद्र यांच्याही भूमिका आहेत तर करण दिग्दर्शन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

Back to top button