मौनी रॉयच्या लग्‍नाचीही ठरली तारीख | पुढारी

मौनी रॉयच्या लग्‍नाचीही ठरली तारीख

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मौनी रॉयने खूप कमी कालावधीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी पूर्वी छोट्या पडद्यावरून ती ‘नागीण’ बनून प्रसिद्ध झाली होती. अलीकडच्या काळात मौनी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मौनी दुबईतील तिचा मित्र उद्योगपती सूरज नांबियारशी रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात. त्यांच्या लग्‍नाची चर्चाही यापूर्वी अनेकदा झाली आहे. पण आता थेट त्यांच्या लग्‍नाची तारीखच समोर आलेली आहे.

27 जानेवारी रोजी हे दोघे लग्‍न करत असल्याची माहिती आहे. अर्थात दोघांपैकी कुणीही अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पण, लग्‍नाची तयारी सुरू झाली आहे. हे दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असून इटली किंवा दुबईत ठरावीक नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्‍न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मौनीचे होमटाऊन असलेल्या कूचबिहार येथे रिसेप्शन दिले जाणार असल्याचे कळते. दरम्यान, मौनी आगामी काळात ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे.

Back to top button