

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेमाप्रेमींना गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड्सची प्रतीक्षा नेहमीच लागून राहिलेली असते. हा एक प्रतिष्ठित ॲवॉर्ड आहे. या ॲवॉर्डच्या ८२ व्या सोहळ्याच्या आयोजनाची तारीख समोर आली आहे. याचे आयोजन ५ जानेवारी, २०२५ रोजी होईल. ८२ व्या गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड्समध्ये प्रोजेक्ट पाठवण्यासाठी १ ऑगस्ट, २०२४ पासून वेबसाईट खुली होईल.
वेबसाईटवर एन्ट्री सुरू होताच सर्व आपापली एन्ट्री या मोठ्या पुरस्कारासाठी पाठवू शकता. शेवटची तारीख ४ नोव्हेंबर, २०२४ आहे. एन्ट्री केवळ ऑनलाईनच पाठवता येईल. नॉमिनेशनची घोषणा ९ डिसेंबर, २०२४ रोजी होईल. टेलीव्हिजनसाठी फायनल स्क्रीनिंगची तारीख २४ नोव्हेंबर, २०२४ आहे. मतदात्यांना टीव्ही नॉमिनेशनसाठी बॅलेट पाठवण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर, २०२४ आहे. मोशन पिक्चर्सचे नॉमिनेशन बॅलेट पाठवण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर, २०२४ आहे. मतदात्यांचे फायनल बॅलेट १३ डिसेंबर २०२४ रोजी पाठवली जाईल आणि १ जानेवारी, २०२५ रोजी मिळतील.