Rajeshwari Kharat : फँड्री फेम जब्या-शालूची जोडी कशी वाटली? सोमनाथ अवघडे-राजेश्वरी पुन्हा भेटीला | पुढारी

Rajeshwari Kharat : फँड्री फेम जब्या-शालूची जोडी कशी वाटली? सोमनाथ अवघडे-राजेश्वरी पुन्हा भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागराज मंजुळेच्या फँड्री चित्रपटातील शालू आणि जब्या यांच्या नव्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. फँड्रीतील (Rajeshwari Kharat) शाळेची पोर शालू म्हणजेच राजेश्वरी खरात आणि जब्या अर्थातच सोमनाथ अवघडे यांचा एऐक फोटो व्हायरल होतोत. फँड्रीमध्ये दोघेही शाळकरी मुले दाखवण्यात आली होती. आता हे दोघे मोठे झाले आहेत. राजेश्वरी खरात हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे पुन्हा हे दोघे एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार का, असा कयास चाहते बांधत आहेत. (Rajeshwari Kharat)

राजेश्वरीने जब्यासोबतचा एक फोटो फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- कशी काय जोडी (Kashi kay mg jodi .. 🫶🏻♥️#shalu #jabya #forever). यावरून दोघेही आता नव्या चित्रपटात पुन्हा दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी, फायर इमोजी शेअर केले आहेत. तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

Back to top button