Aditi Rao Hydari-Siddharth : लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर | पुढारी

Aditi Rao Hydari-Siddharth : लग्न नव्हे...अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदिती राव हैदरी आणि साऊथ अभिनेता सिद्धार्थच्या लग्नाचे वृत्त समोर आले. पण, या वृत्ताचे खंडन करत आता या लव्हबर्ड्सने साखरपुडा केल्याची हिंट दिली. कपलने एंगेजमेंट रिंग दाखवली आहे. (Aditi Rao Hydari-Siddharth) अदिती रावने सिद्धार्थ सोबत एंगेजमेंटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघे एंगेजमेंट रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. (Aditi Rao Hydari-Siddharth)

अदिती राव हैदरी ही राजघराण्याशी संबंधित आहेत. सिद्धार्थ हा साऊथचा लोकप्रिय अभिनेता आहे.

सोशल मीडियावर अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या अफवांमध्ये अभिनेत्री सिद्धार्थ सोबत आपला साखरपुडा अधिकृतपणे एंगेजमेंट २८ मार्च केली आहे. कृती खरबंदा-पुलकित सम्राट नंतर आता बॉलीवूडचे लोकप्रिय कपल अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ देखील लवकरचं लग्न करतील.

अदिती राव हैदरीने पती सोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘त्याने हो म्हटलं! E. N. G. A. G. E. D.’ दुसरीकडे सिद्धार्थने देखील सारखाच फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हो म्हटलं!’

कपलने तेलंगानाच्या श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं आहे. आता या अफवांचे अभिनेत्रीने खंडन केले आणि साखरपुड्याचे फोटो शेअर केले. फोटो समोर आल्यानंतर हे स्पष्ट झालं की, कपलचा साखरपुडा झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

Back to top button