The Sabarmati Report Teaser : हृदयद्रावक कथा घेऊन आला विक्रांत मेसी, ‘द साबरमती रिपोर्ट’ टीजर | पुढारी

The Sabarmati Report Teaser : हृदयद्रावक कथा घेऊन आला विक्रांत मेसी, 'द साबरमती रिपोर्ट' टीजर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’च्या निर्मात्यांनी एक हृदयद्रावक कथा आणलीय. (The Sabarmati Report Teaser) २७ फेब्रुवारी, २००२ रोजी गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्टेशन नजीक साबरमती एक्सप्रेसवर घडलेली ही कथा आहे. ३ मे, २०२४ रोजी चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आलीय. निर्मात्यांनी अखेरला मच अवेटेड टीजर रिलीज केला आहे. जी ही दु:खद घटना सर्वांच्या समोर एक वेगळी छाप सोडायला तयार आहे. (The Sabarmati Report Teaser)

मुख्य भूमिकेत दिसले हे स्टार

‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीजरने २२ वर्षांपर्यंत समोर न आलेल्या गोष्टींची एक झलक दाखवली आहे, जेव्हा साबरमती एक्सप्रेसमध्ये दु:खद घटना घडली. टीजरमध्ये लीड भूमिकेत विक्रांत मेसी, राशी खन्ना आणि रिद्धि डोगराची दमदार भूमिका आहे. विक्रांत मेसी पुन्हा एकदा प्रभावशाली भूमिकेत दिसतील. टीजरमध्ये दाखवण्यात आलेले व्हिज्युअल्स आणि डायलॉग खोल छाप पाडणारे आहेत.

‘द साबरमती रिपोर्ट’ चा टीजर शेअर करत विक्रांत मेसीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर लिहिलं, An event that shook the nation. Turned into an incident that changed Indian history forever. Presenting the #TheSabarmatiReport, in cinemas on 3rd May, 2024.

विक्रांत मेसी चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

Back to top button