Vin Diesel : विन डिजेलने शेअर केला दीपिका पादुकोनसोबतचा ‘तो’ फोटो | पुढारी

Vin Diesel : विन डिजेलने शेअर केला दीपिका पादुकोनसोबतचा 'तो' फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखवणाऱ्या दीपिका पादुकोनचे हॉलीवूडमध्येही खूप फॅन्स आहेत. यामध्ये प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विन डीजलचे नावदेखील समाविष्ट आहे. रॉक नावाने प्रसिद्ध विन डीजलने दीपिका पादुकोण सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्याने एक पोस्टदेखील लिहिली आहे. यामध्ये एक हिंट लपली आहे.

यामध्ये तो दीपिकाला ब्लेजर घालताना दिसतो आहे. या फोटोत विनने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये हिंट लपले आहे.
दीपिका सोबतचा एक फोटो शेअर करत विन डीजलने एक नव्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. यावरून तर्क लावला जाऊ शकतो की, दीपिका पुन्हा एकदा सोबत दिसू शकतात. यावेळी दीपिका विन डीजलच्या बहिणीच्या भूमिकेत दिसू शकते. विन डीजलच्या पोस्ट वरून वाटते की, यामध्ये या माहितीचे हिंट देण्यात आले आहे.

रॉकने दिली मोठी हिंट

विन डीजलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलं, “जेव्हा मी त्या दिग्दर्शकांबद्दल विचार करतो. तेव्हा एकाहून अधिक वेळा ते माझ्यासोबत काम करू इच्छितात. तर मी नेहमी नम्र होतो. हे तेव्हाचे फोटो आहेत, जेव्हा मी भारतात गेलो होतो. मी दीपिकाला वचन दिलं होतं की, मी त्यावेळचे दिग्दर्शक डीजे कारुसोबत भारतात जाईन. माझ्या सर्वात मोठ्या मुलीने स्क्रिप्ट वाचली, जी डीजेने मला पाठवली होती. ती ही स्क्रिप्ट वाचून रडली… मी तिला विचारलं की, का रडतेय. तर ती म्हणाली, एक भाऊ आणि बहिणीची ही कहाणी तिच्यासाठी सत्य होते आणि भावूकदेखील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vin Diesel (@vindiesel)

Back to top button