JNU Teaser: उर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर ‘जेएनयू’चा धमाकेदार टीझर

urvashi rautela JNU Movie
urvashi rautela JNU Movie
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्वशी रौतेला, रवी किशन आणि पियुष मिश्रा स्टारर चित्रपट JNU: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी च्या घोषणेपासून चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच, युजर्स नी इंटरनेटवर कमेंट करण्यास सुरुवात केली. आज या चित्रपटाचा पहिला व्हिडिओ टीझर रिलीज करण्यात आला आहे. JNU राष्ट्रवाद, वैचारिक सक्रियता आणि विद्यार्थी चळवळी या मुद्द्यांवर चर्चा आणि वादावर आधारित रोमांचक चित्रपट आहे. हा चित्रपट राष्ट्रवाद आणि शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावर भाष्य करतो. दिग्दर्शक विनय शर्मा 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' (JNU) चित्रपट घेऊन येत आहे. (Rashmi Desai JNU Teaser) ज्यामध्ये कॉलेज स्टुडेंट्सचा तो चेहरा दिखाया जाएगा, जो रोमान्सने दूर राजकारणाबद्दल काय विचार करतो आणि त्याला काय करायचे आहे यावर आधारित चित्रपट असेल. (Rashmi Desai JNU Teaser) 'जेएनयू' चे फर्स्ट पोस्टर समोर आले होते. पोस्टरमध्ये भारताच्या नकाशावर हात दिसतो. पोस्टर पाहून म्हटले जाऊ शकते की, हा चित्रपट राजकीय मुद्द्यांना धरून असेल. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे टीजर रिलीज केले आहे.

उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, रवी किशन, पियुष मिश्रा, विजय राज, रश्मी देसाई आणि सोनाली सैगल यांसारख्या प्रतिभांवंत कलाकारांचा इथे अभिनय पाहायला मिळणार आहे.

जेएनयूच्या या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेचे मूळ कथानक दिसत आहे. टीझरच्या पहिल्या दृश्यात, जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या वर्गात कमी आणि बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये जास्त आढळतात असा संवाद ऐकायला मिळतो. पोलिसाच्या भूमिकेत रवी किशन म्हणतो, "पाकिस्तानचा व्हिजा मिळणे सोपे आहे, पण जेएनयूसाठी व्हिजा मिळणे अवघड नाही. टीझरच्या शेवटच्या भागात विद्यार्थी नेता म्हणतो, " आम्ही इथल्या मगरी आहोत, इथे आमचे सरकार आहे , त्यामुळे आमच्यासोबत राहण्यात तुमचा फायदा आहे. "

महाकाल मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित, जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू) निर्मित, प्रतिमा दत्ता निर्मित आणि विनय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, कृष्णा, सिंधुदुर्ग आदी कलाकार आहेत. रश्मी देसाई, अतुल पांडे, सोनाली सेगल ही प्रतिभावंत कलाकार आहेत . हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली की, जेएनयू चित्रपटाचा भाग बनणे हा माझ्यासाठी एक उद्बोधक अनुभव होता. माझ्या पात्रात विद्यार्थ्यांची सक्रियता आणि लवचिकतेची भावना आहे आणि मला विश्वास आहे की हा चित्रपट कॅम्पसच्या राजकारणातील गुंतागुंत आणि तरुण आवाजांच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकेल.

आमचा चित्रपट आजच्या तरुणाईच्या दोन्ही बाजू दाखवतो आणि चुकीच्या प्रभावाखाली येणारी एक विचारधारा दाखवतो, हा चित्रपट विनोद, गाणी आणि JNU विद्यापीठात घडणारे संस्मरणीय महाविद्यालयीन क्षण जे जातीय मुद्द्यांवर नसून मनोरंजनाच्या सहाय्याने सादर करत आहोत .

rashmi desai
rashmi desai

टीझरमध्ये एका युनिव्हर्सिटीची कहाणी आहे, जिथे स्टुडेंट्स क्लासरूमपेक्षा अधिक समाचार, वृत्तांमध्ये झळकलेले दिसतात. चित्रपट विद्यार्थ्यांमध्ये होत असलेले राजकारण उघड करेल. या विद्यापीठात देन वेगवेगळे विचार प्रवाहांचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट बनले आहेत. टीझरमध्ये निवडणुकांच्या वेळचे वातावरण देखील विस्ताराने दाखवले जाईल, जे रोमान्सने दूर राजकारणाचे सच समोर आणेल. चित्रपटाचे टीजर सोशल मीडियावर शेअर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news