Thalapathy vijay : ‘थलपति’ला पाहण्यासाठी केरळच्या फॅन्सची तुफान गर्दी; गाडीचे नुकसान (video)

Thalapathy vijay
Thalapathy vijay
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार थलपति विजय ( Thalapathy vijay ) १४ वर्षांनंतर एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने केरळला पोहोचला होता. दरम्यान विजयच्या चाहत्यांना ही माहिती समजताच त्याला भेटण्यासाठी फॅन्सच्या गर्दीचा महापूर लोटला. केरळच्या विमानतळावर नाकाबंदी करून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र, त्याला पाहण्यासाठी तेथे जमलेल्या गर्दीने अभिनेत्याच्या गाडीचे नुकसान केलं आहे. या घटनेच थलपतिच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुपरस्टार थलपति विजयच्या ( Thalapathy vijay ) कार गाडीच्या उजवा दरवाजा पूर्णपणे खराब झाल्याचे दिसत आहे. दरवाजाच्या काचा पूर्णपणे फोडून कारच्या आतमध्ये पडलेल्या दिसतात. तसेच कारची पुढील आणि मागील बाजूदेखील चेपली आहे. केरळमध्ये शुटिंगसाठी विजय आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी फॅन्सची मोठी गर्दी झाली. यावेळी त्याच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान थलपति सुरक्षित असून तो आपल्या कामावर निघून गेला आहे.

सुपरस्टार थलपति विजयच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'GOAT' च्या रिलीजची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. हा चित्रपट व्यंकट प्रभू बनवत आहेत. या चित्रपटात थलपतिची दुहेरी भूमिका आहे. चित्रपटावर वेगाने काम सुरू असून चेन्नई- श्रीलंका आणि हैदराबाद-थायलंडपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. याच दरम्यान चित्रपटाचा पुढचा सेट केरळमध्ये लावण्यात आला होता. दरम्यान ही घटना घडली आहे.

याआधी श्रीलंकेत या चित्रपटाचे शूटींग केले जाणार होते. मात्र, आता केरळच्या तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सध्या शूटिंग होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news