Shaitaan-Yodha Office Box Collection : ‘शैतान’ समोर सिद्धार्थच्या ‘योद्धा’ ची जादू कमी

Shaitaan-Yodha Office Box Collection
Shaitaan-Yodha Office Box Collection
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांचा 'योद्धा' हा चित्रपट थिअटरमध्ये रिलीज होवून चार दिवस झाले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण-आर माधवन यांचा 'शैतान' हा थिअटरमध्ये येवून ११ दिवस उलटले आहेत. दरम्यान दोन्ही चित्रपट बॉक्स आफिसवर जोरदार कमाई करत आहेत. परंतु, आधी रिलीज झालेल्या 'शैतान' च्या पुढे सिद्धार्थच्या 'योद्धा' ची जादू कमी झाली आहे. 'योद्धा' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी होत चालले आहे. ( Shaitaan-Yodha Office Box Collection )

संबंधित बातम्या 

शैतान

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर. माधवन यांच्या 'शैतान' चित्रपटाची कथा ब्लॅक मॅजिकभोवती फिरताना दाखवण्यात आली आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाचे सुरूवातीपासून कमाईचे आकडे वाढत चालले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १४.७५ कोटी रुपयांची भरघोष अशी कमाई केली आहे. तर ११व्या दिवशी ३ कोटींची कमाई केली आहे. तर १०व्या दिवशी १०.१७ कोटींची कमाई केली होती. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०६.०५ कोटींच्या घरात पोहोचले आहे.

योद्धा

दुसरीकडे बॉलिवुड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पाटनी यांचा धमाकेदार 'योद्धा' चित्रपटाने १५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिस तिकीट विक्रीमधून ४.१० कोटी रुपयांची ओपनिंग केली. यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ७ कोटींची भरघोष अशी कमाई केली. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली. 'योद्धा'ने चौथ्या दिवशी २.१५ कोटी रुपयांची कमाई केली, दरम्यान या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १९.०० कोटी रुपये झाले आहे.

'योद्धा' चित्रपटाला फक्त चार दिवस प्रदर्शित होवून झाले आहेत. तर 'शैतान' हा चित्रपटाने ११ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहेत. यामुळे 'शैतान' ची आकडेवारी वाढत गेली आहे. तर 'योद्धा' ची आगामी काळात आणखीण कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. तर 'शैतान' १५० कोंटीकडे वाटचाल करणार असल्याचेही बोलले जात आहे. ( Shaitaan-Yodha Office Box Collection )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news