नक्षलवादापासून सुटका झालेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच येणार मोठ्या पडद्यावर

धर्मरावबाबा आत्राम चित्रपट
धर्मरावबाबा आत्राम चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : नक्षलवादापासून सुटका ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास घडलेला 'धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नक्षलवादापासून सुटका करत दुर्गम भागाला आशेचा किरण दाखवणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.

'एबिना एंटरटेनमेंट'च्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला. 'जल, जंगल, जमीन हमारा है और ये जमीन मालिकाना हक हमारा अधिकार है", असं ब्रीदवाक्य ऐकायला येत सुरु झालेला 'धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा' या चित्रपटाचा ट्रेलर आशयघन व साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती नीतू जोशी यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. भुषण अरुण चौधरी यांनी दिग्दर्शन केले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांची तरुणपणीची भूमिका अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.

नक्षलवाद, तेथील थरार, आदिवासी पाड्यांचा विकास आणि धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून हुबेहूब मांडण्यात आला आहे. या चित्रपटाबाबत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, "मला नवीन जीवन मिळालं. नक्षलवादींपासून सुटका करत मी बाहेर आलो. नदी नाल्याच पाणी प्यायचो. जंगलाबाहेर पडेन की नाही याची शाश्वतीही नव्हती. या सर्व प्रवासाची व संघर्षाची बाजू या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे".

निर्मात्या नीतू जोशी यांनी चित्रपटाबाबत म्हटलं की, "हा चित्रपट बनवताना मी बाबांना जवळून ओळखलं, त्यांच्या संघर्षांना मला समजून घेता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदानाचा अनुभव घेता आला. या चित्रपटातून नव्या पिढिला चांगला संदेश व उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा नक्की मिळेल. या चित्रपटात, आदिवासी भागातून राज्य मंत्री बनण्यापर्यंतचा बाबांचा प्रवास दाखवला आहे".

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news