पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. ( Sushant Singh Rajput) इतके महिने झाल्यानंतरही सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील कोणतीही अपडेट्स समोर न आल्याचे तिने व्हिडिओ रेकॉर्ड करून म्हटले आहे. ( Sushant Singh Rajput)
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत बांद्रा येथल फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. रिपोर्ट्सनुसार, दावा करण्यात आला की, सुशांतने स्वत:चे जीवन संपवले. परंतु, त्याचे कुटुंबीय ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाही. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.
सुशांतच्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण या मृत्यू प्रकरणात कोणतेही अपडेट समोर आले नाही. आता श्वेताने एक व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींना विनंती केली आहे.
सुशांतच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते- मी श्वेता सिंह किर्ति आहे सुशांत सिंह राजपूतची बहिण, हा संदेश आमचे प्राईम मिनिस्टर मोदी जी यांच्याठी रेकॉर्ड करत आहे. मी आपला थोडा वेळ हवा आहे. माझ्या भावाचा मृत्यू होऊन ४५ महिने झाले आहेत. परंतु, आमच्याकडे करण्यात आलेल्या तपासाचे कोणतेही अपडेट आमच्याकडे नही. मी आपणास विनंती करते की, या प्रकरणाकडे कृपया लक्ष द्या. या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. आपण लक्ष दिल्यास आमच्यासाठी मदत ठरेल…"
सुशांतच्या बहिणीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स तिला समर्थन देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले की, 'आम्ही तुमच्या सोबत आहे'. सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' होता, ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.