Ranveer-Deepika Viral Video : रणवीर-दीपिकाचे कारमधील ‘ते’ रोमँटिक दृश्य व्हायरल; पहा व्हिडिओ | पुढारी

Ranveer-Deepika Viral Video : रणवीर-दीपिकाचे कारमधील 'ते' रोमँटिक दृश्य व्हायरल; पहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आई बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या गुड न्यूजनंतर या लव्ह बर्ड्सचे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग दरम्यानचे फोटो व्हायरल झाले. जामनगरमध्ये कार्यक्रमानंतर हे कपल मुंबईत स्पॉट झाले. त्यानंतर आता या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका आणि रणवीरचा किसिंगचे दृश्य व्हायरल झाले आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची जोडी चाहत्यांना खूप आवडते. अलीकडेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये खूप मस्ती करताना दिसून आले. आता यानंतर या जोडप्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग कारमध्ये किस करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणला जाण्यापूर्वी ओठांचे चुंबन घेताना दिसत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. दीपिका आणि रणवीरचे चाहते हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. चला तर मग पाहूया दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा हा व्हायरल व्हिडिओ

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या व्हिडिओवर यूजर्सनी या कमेंट्स केल्या आहेत. या जोडप्याच्या व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करताना दिसले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘बेस्ट कपल’. याशिवाय अनेक यूजर्स दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना ट्रोल करताना दिसले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या या व्हिडिओबद्दल तुमचे मत काय आहे, कृपया आम्हाला कमेंट करून सांगा.

हेही वाचा

Back to top button