Murder Mubarak : पंकज त्रिपाठीच्या ‘मर्डर मुबारक’ चा ट्रेलर पाहिला का? | पुढारी

Murder Mubarak : पंकज त्रिपाठीच्या 'मर्डर मुबारक' चा ट्रेलर पाहिला का?

मर्डर मुबारक या चित्रपटाचा ट्रेलर ज्यावेळी रीलिज झाला, त्यावेळी त्याला चाहत्यांनी अमाप प्रतिसाद दिला होता. त्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची अपेक्षा होती. तो ट्रेलरही आता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात एका क्लबमधून होते आणि त्यानंतर पंकज त्रिपाठीचा व्हॉईस ओव्हर येतो. द रॉयल क्लब दिल्लीची पार्श्वभूमी यात आहे. हा क्लब एका ब्रिटिशाने ब्रिटिशांसाठी सुरू केला होता. पुढे ब्रिटिश निघून गेले; पण त्यानंतर जे आले, ते ब्रिटिशांपेक्षाही अधिक खतरनाक होते, असे याचे एकंदरीत स्वरूप असल्याचे संकेत आहेत.

यादरम्यान क्लबमधील काही हसरे, विनोदी क्षणही दाखवले गेले आहेत. सारा अली खानचा डान्स देखील यात लक्षवेधी ठरला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान यांच्याशिवाय विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा आणि सुहेल नय्यर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Back to top button