Pulkit Samrat-Kriti Kharbanda : पुलकित-क्रितीची लग्नपत्रिका संगीत थीमवर | पुढारी

Pulkit Samrat-Kriti Kharbanda : पुलकित-क्रितीची लग्नपत्रिका संगीत थीमवर

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा हे गेल्या काही ५ दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्या लग्नाबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. क्रिती आणि पुलकितच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. लग्नपत्रिका संगीत थीमवर आधारित आहे. (Pulkit Samrat-Kriti Kharbanda) लग्नपत्रिकेवर दोघांचे चित्र रेखाटले आहे. त्यात घराच्या बाल्कनीत दोघे जण बसलेले दिसून येत आहेत. पुलकितच्या हातात गिटार आहे आणि त्याच्या बाजूला क्रिती बसलेली आहे. शेजारी त्यांचे श्वानही बसलेले दाखवले आहे. माझ्या लोकांसह उत्सव साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, असे पत्रिकेत लिहिले आहे. यावर पुलकित आणि क्रिती यांची नावेही आहेत. ही पत्रिका सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. मात्र, या पत्रिकेत दोघांच्या लग्नाची तारीख दिलेली नाही. दोघे १३ मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप पुलकित आणि क्रितीने लग्नाच्या तारखेबाबत काहीच भाष्य केलेले नाही. (Pulkit Samrat-Kriti Kharbanda)

Back to top button