आपल्या चोखंदळ निवडीसाठी खास ओळखला जाणारा आमीर खान चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात सातत्याने यशस्वी होत आला आहे. आताही आमीरच्या पुढील चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यादरम्यान आमीर खानचा एक अनोखा लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आमीरचा हा नवा लूक बराचसा भयावह आहे आणि अर्थातच चौकटीबाहेरचा आहे. (Aamir Khan New Look ) आमीरच्या या नव्या चित्रपटाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत, हे मात्र तितकेच खरे आहे. (Aamir Khan New Look )
आमीरने सोशल मीडियावर यावेळी बरीच छायाचित्रे पोस्ट केली असून, यातील एका छायाचित्रात 'तारे जमीन पर'मधील ईशान अवस्थीची भूमिका साकारणारा बालकलाकार दर्शील सफारी देखील दिसून आला. हे दोघेही यानिमित्ताने १६ वर्षांनंतर प्रथमच एकत्रित येत आहेत. या नव्या लूकमधील त्याचा चेहरा मात्र बराच भयावह असल्याने याची उत्सुकता निर्माण होणे साहजिक मानले जाते. या छायाचित्रात केस विखुरलेले आहेत. शिवाय, डोळ्यातही आग आहे. चेहऱ्यावर अनेक चट्टे आहेत. आगामी प्रोजेक्टमधील ही झलक असू शकते, असा चाहत्यांचा कयास आहे.