Devara Janhvi Kapoor : देवरामधून जान्हवीचा नवा फोटो, टपोरे डोळे अन्‌ साऊथ लूक

जान्हवी कपूर
जान्हवी कपूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवीचा फर्स्ट लूक व्हायरल झाल्यानंतर आता तिचा नवा फोटो व्हायरल झाला आहे. साऊथ लूकमध्ये जानवी एकदम परफेक्ट दिसत आहे. टपोरे डोळे, कानात झुमके, कपाळावर टिकली, डोळ्यात काजळ आणि साऊथ लेहंगा असा तिचा पेहराव असून ती फोटोत हसताना दिसत आहे. Devara या एक्स अकाऊंटवरून लिहिण्यात आले की- Wishing our beloved Thangam, #JanhviKapoor a happy and joyous birthday!! ✨ #Devara ?

Devara या एक्स अकाऊंटवरून लिहिण्यात आले की- Wishing our beloved Thangam, #JanhviKapoor a happy and joyous birthday!! ✨ #Devara ?

जान्हवी कपूर 'देवरा' (Devara) या साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतून डेब्यू करणार आहे. या चित्रपटामध्ये ती साऊथ सुपरस्टार 'ज्युनियर एनटीआर' (Jr NTR) सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले होते.

जान्हवी कपूरचा हा डेब्यू चित्रपट आधी 'एनटीआर३०' (NTR30) नावाने समोर आले होते. हा चित्रपट ज्युनियर एनटीआर (Jr NTR) च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे, यामध्ये ज्यु. एनटीआरने दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपट दिग्दर्शक कोराताला शिवा यांचे दिग्दर्शन आहे. या कथेची कहाणी फिशरमॅन कम्युनिटीवर आधारीत आहे. रिपोर्टनुासर, हा चित्रपट दोन भागात रिलीज होईल. सैफ अली खान, प्रकाश राज, जिस्सू सेनगुप्ता, श्रीकांत, टॉम चाको, नरेन, मुरली शर्मा मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत रिलीज होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news