Janhvi Kapoor : जान्हवीला बर्थडेला मिळालं मोठं गिफ्ट, रामचरण सोबत पडद्यावर

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज ६ मार्च रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास औचित्याने जान्हवी कपूरच्या तमाम फॅन्सकडून आणि सेलिब्रिटीजकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. (Janhvi Kapoor ) जान्हवी कपूरच्या फॅन्सना आपला आवडत्या अभिनेत्रीला मिळालेले अनोखे गिफ्ट पाहून खूप उत्सुकता वाढलीय. जान्हवीला तिच्या वाढदिवसा दिवशी साऊथचा मोठा चित्रपट हाती लागलाय. ती साऊथ सुपरस्टार राम चरण सोबत मोठ्या पडद्यावर दिसेल. (Janhvi Kapoor)

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने जान्हवी कपूरच्या नव्या चित्रपटाबद्दल अपडेट दिलं आहे. तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं – राम चरण आणि जान्हवी कपूरने सुकुमार-मैत्री-बुची बाबू सनाच्या पॅन इंडिया मुव्हीसोबत हातमिळवणी केलीय. बूची बाबू सना यांचे दिग्दर्शन आहे. राम चरण-जान्हवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण-जान्हवी कपूरच्या या चित्रपटाचे नाव 'आरसी १६' असे घोषित करण्यात आले होते. कहाणी सुकुमार यांची असून संगीत एआर रहमान यांचे आहे.

जान्हवीच्या झोळीत 'मिस्टर अँड मिसेज माही', 'उलझ', 'देवरा', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'कर्ण' यासारखे चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news