War 2 : हृतिक रोशनची जबराट एन्ट्री, जपानच्या ऐतिहासिक मंदिरात शूटिंग

War 2
War 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा हँडसम अभिनेता हृतिक रोशन डान्सिंग शिवाय पॉवरफुल अभिनयाची चर्चा होतेय. चाहत्यांना त्याची जबराट एन्ट्री नक्कीच पसंतीस उतरेल. (War 2) चाहते हृतिकच्या आगामी चित्रपटातील वॉर-२ ची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे. हृतिकच्या इंट्रोडक्शन सीन धमाकेदार आणि ॲक्शनने भरलेला असणार आहे. (War 2)

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. 'फायटर' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत रोमान्स आणि ॲक्शन केल्यानंतर हृतिकने आता त्याच्या बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट 'वॉर २' वर काम सुरू केले आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर'ने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यावेळी 'कबीर'ची भूमिका हृतिकला खूप आवडली होती. आता सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईडमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 'वॉर २' चे शूटिंग ७ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आहे. हृतिक रोशनचा परिचयाचा सीन खूपच धमाकेदार असणार आहे.

'वॉर २' हा ॲक्शनपट आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर बेन जॅस्पर हृतिकला ॲक्शन सीन्सचे प्रशिक्षण देणार आहेत.
जपानमधील ऐतिहासिक मंदिरात होणार शूट

हृतिकच्या इंट्रोडक्शन सीन खूपच जबराट असणार आहे. याचे शूटिंग जपानमधील शाओलिन टेम्पलमध्ये होणार आहे. येथे अनेक जबराट ड्रॉपिंग स्टंट सीन शूट केले जातील. मोठ्या पडद्यावर अप्रतिम असे हे सीन्स असणार आहेत. हृतिकचा पहिला सीन तलवारबाजीचा असेल, ज्यामध्ये तो कोरियन खलनायकासोबत लढताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी हृतिक विशेष प्रशिक्षण घेत आहे. तो त्याच्या शरीरयष्टीवरही जबरदस्त काम करत आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे प्रोमो शूट अबुधाबीमध्ये पूर्ण झाले आहे.

दरम्यान, ज्युनिअर एनटीआर एप्रिलमध्ये शूट करणार असल्याची माहिती समोर आलीय. हा दाक्षिणात्य अभिनेता हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news