Shahrukh-Ram charan : ‘इडली वडा राम चरण कहां है तू’ शाहरुखच्या वादग्रस्त कॉमेंटवर मेकअप आर्टिस्टने सोडली पार्टी (Video) | पुढारी

Shahrukh-Ram charan : ‘इडली वडा राम चरण कहां है तू’ शाहरुखच्या वादग्रस्त कॉमेंटवर मेकअप आर्टिस्टने सोडली पार्टी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा प्री-वेडिंग सोहळा संपला आहे. तीन दिवसीय समारंभातील शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Shahrukh-Ram charan ) साऊथ अभिनेता राम चरण विषयी शाहरुखने वादग्रस्त कॉमेंट केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वादग्रस्त कॉमेंट केल्यामुळे राम चरणची मेकअप आर्टिस्ट पार्टी सोडून निघून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. Shahrukh-Ram charan (Shahrukh-Ram charan)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग फंक्शनची खूप चर्चा होत आहे. या सोहळ्यात अनेक बॉलिवूड, हॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतून अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. कपलच्या संगीत सेरेमनीमध्ये स्टार्सनी दमदार परफॉर्मन्स दिला आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली. पॉप सिंगर रिहानाच्या गाण्यावर देखील अंबानी फॅमिलीने ताल धरला.

दरम्यान, यावेळी शाहरुख खान, आमिर खान, राम चरण आणि सलमान खानने देखील एकत्र ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला. पार्टी संपताच सोशल मीडियावर किंग खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहरुखने राम चरणवर वादग्रस्त कॉमेंट केल्याने राम चरणची मेकअप आर्टिस्ट मध्ये पार्टी सोडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeba hassan zaidi (@zebahassan)

नेमकं काय घडलं?

‘नाटू नाटू’ गाण्यावर बॉलीवूडचे तिन्ही खान शाहरुख, सलमान आणि आमिर थिरकले. हा परफॉर्मन्स दमदार बनवण्यासाठी साऊथ अभिनेता राम चरणने देखील जॉईन केलं. स्टेजवर डान्स करण्यासाठी शाहरुख खानने राम चरणला स्वत: बोलावलं. पण, राम चरणला बोलावण्याचा अंदाज लोकांना आवडला नाही. किंग खान राम चरणला हाक मारताना म्हणाला- ‘इडली वडा राम चरण कहां है तू।’ पण ही चेष्टा शाहरुखला भारी पडली. मेकअप आर्टिस्ट पार्टी सोडून गेली तर अनेक साऊथ फॅन्सनी शाहरुखला खरे-खोटे ऐकवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeba hassan zaidi (@zebahassan)

Back to top button