Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाची चित्रपटसृष्टीत १९ वर्षे पूर्ण | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाची चित्रपटसृष्टीत १९ वर्षे पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने फिल्म इंडस्ट्रीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे. (Tamannaah Bhatia) तमन्नाने २००५ मध्ये बॉलीवूड चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून अभिनयात पदार्पण केले. परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री बनली. (Tamannaah Bhatia)

एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ओपस ‘बाहुबली: द बिगिनिंग’मध्ये तिने अवंतिका साकारलेली तिची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. पुढे जाऊन तिने ‘बबली बाउंसर’, ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि इतर प्रकल्पांसह तिची बहुमुखी प्रतिभा दाखवली. २०२३ मध्ये, तमन्नाने चिरंजीवी-स्टारर ‘भोला शंकर’ सह बॉक्स ऑफिसवर राज्य केले तर रजनीकांत-स्टारर ‘जेलर’ मधील तिच्या ‘कावला’ गाण्याने देशाला वेड लावले आणि ‘बांद्रा’ मधून तिचे मल्याळम इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिची खास मैत्रीण काजल अग्रवाल हिने तमन्नाला सिनेमात जवळपास दोन दशके पूर्ण केल्याबद्दल तिचं कौतुक करून तिला खास शुभेच्छा दिल्या. यावर तमन्ना म्हणाली “खूप खूप धन्यवाद काजू, तुझा अतुलनीय पाठिंबा आणि प्रेम इतक्या वर्षांमध्ये मला कायम प्रोत्साहन देत राहील.”

चाहत्यांना उद्देशून तमन्नाने लिहिते- “माझ्या सर्व कामासाठी तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे असता आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. मी तुम्हाला आवडतील असे सिनेमे बनवत राहण्याचे वचन देते आणि हा प्रवास तुमच्या प्रेमाने कायम सुरू राहू दे ही इच्छा व्यक्त करते ”

तमन्ना ‘ओडेला २’ मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे जॉन अब्राहमसोबत ” वेदा ” आणि तमिळ चित्रपट ‘अरनमानाई ४’ देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Back to top button