Nora Fatehi : नोरा फतेही आता ‘या’ मराठी गाण्यावर थिरकणार | पुढारी

Nora Fatehi : नोरा फतेही आता 'या' मराठी गाण्यावर थिरकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही ( Nora Fatehi  ) ही एक अफलातून डान्सर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. विशेषतः बेली डान्ससाठी तिची खासियत आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने डान्स आयटम केलेले आहेत. आता ‘मडगाव एक्स्प्रेस’ या आगामी चित्रपटात ती चक्क एका मराठी गाण्यावर नृत्य करत असताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या 

या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन बालकलाकार ते अभिनेता असा प्रवास केलेल्या कुणाल खेमू याने केले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सल एंटरटेन्मेंटची ही निर्मिती आहे. या चित्रपटात प्रथमच दिव्येंदु, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी यांची डायनॅमिक तिकडी दिसून येईल.

चित्रपटात ‘ब्रिंग इट ऑन’ अशा इंग्रजी शब्दांनी सुरू होणारे एक मराठी गाणेही आहे. त्यावर नोरा नृत्य करत असताना दिसून येईल. त्यामधील नोराचे एक पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाचा ५ मार्चला ट्रेलर येणार असून २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button