Katrina Kaif : कॅटरिना म्हणते, एक मनमौजी, दुसरा वक्तशीर! | पुढारी

Katrina Kaif : कॅटरिना म्हणते, एक मनमौजी, दुसरा वक्तशीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफने ( Katrina Kaif )  बॉलमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. गील २० वर्षाच्या कालावधीत तिने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ती ‘मेरी ख्रिसमस चित्रपटातून झळकली होती. या चित्रपटातील तिचर्ची भूमिका प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस उतरली होती. याच कॅटरिनाने आपल्या दोन दशकांच्या वाटचालीतील प्रवास शब्दबद्ध करताना सलमान खान व अक्षय कुमार या दिग्गज अभिनेत्यांसह काम करण्याचा अनुभव कसा राहिला, त्याचे बरेच वर्णन केले.

संबंधित बातम्या 

यात Katrina Kaif म्हणाली होती, यातील एक जण मनमौजी आहे तर दुसरा अतिशय वक्तशीर! कॅटरिना कैफ व सलमान खान यांनी आजवर बरेच हिट चित्रपट दिले आहेत. या केमिस्ट्रीबद्दल बोलताना कॅटरिना म्हणाली, सलमान सेटवर कधीही लवकर येत नाही. मुळात तो स्वत: च्या कलेने वागणे पसंत करतो, उशिरापर्यंत झोपून राहण्याची सवय कधीच मोडत नाही, मात्र, एकदा सेटवर आल्यानंतर कामात १०० टक्के झोकून देण्याची त्याची समर्पित वृत्ती आदर्शवत आहे.

अक्षय व सलमान यांच्यात काय साम्य आहे, या प्रश्नावर कॅटरिना अगदी भरभरून बोलली ती म्हणाली, अक्षय व सलमान दोषेही दिग्गज आहेत. मात्र, ते एकमेकांपेक्षा खूप विभिन्न विचारांचे आहेत. एकीकडे सलमान सेटवर अतिशय उशिरा येतो. दुसरीकडे, अक्षय मात्र अगदी वक्तशीर असतो आणि तो अगदी वेळेत सेटवर पोहोचलेला असतो. एकीकडे, अक्षय अभिनयात बरेच नवे प्रयोग राबवण्यावर भर देतो.

अभिनेता मात्र, निर्देशक सांगेल त्याच चौकटीत भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मी या उभयतांशिवाय आणखी वेगळी आहे. मी माझा सहकलाकार कोण आहे, तो किती मोठा कलाकार आहे, याचा अजिबात विचार करत नाही. त्याऐवजी माझ्या भूमिकेत मला कसा न्याय देता येईल, त्यावर माझे सारे लक्ष केंद्रित असते.

Back to top button