Movie Shishyavrutti : थ्री इडियट फेम ‘मिलिमीटर’ दुष्यंत वाघचा येतोय शिष्यवृत्ती चित्रपट | पुढारी

Movie Shishyavrutti : थ्री इडियट फेम 'मिलिमीटर' दुष्यंत वाघचा येतोय शिष्यवृत्ती चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई-वडील जरी आपल्या मुलांवर संस्कार घडवत असले तरी, मुलांच्या एकंदरीत जडणघडणीत, विचारांत सर्वाधिक मोठा वाटा असतो तो शिक्षकाचा. (Movie Shishyavrutti) कारण मुलं जेवढा वेळ घरात नसतात त्याहून अधिक काळ त्यांचा शाळेत आपल्या शिक्षकांच्या सहवासात जातो. त्यामुळे आपले आचार-विचार हे शिक्षकांवर अवलंबून आहेत, अशीच शिक्षक आणि विद्यार्थी यांची भावस्पर्शी गोष्ट लेखक दिग्दर्शक अखिल देसाई यांनी देखील आपल्या साज इंटरनेटमेंट बॅनर अंतर्गत “शिष्यवृत्ती” सिनेमातून शिष्यवृत्ती विषयाला एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, आज या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचे सहनिर्माते सुरेश ढोरे, अनिल आणि सुनील बच्छाव आहेत. (Movie Shishyavrutti)

चित्रपटात थ्री इडियट चित्रपटाचा मिलिमीटर फेम दुष्यंत वाघ, निकिता पाटील, रुद्र ढोरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे,उदय सबनीस यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. शिक्षक विद्यार्थी सोबत आजच्या शिक्षण पद्धती आणि त्यांच्या अंमलबजवणीवर देखील दिग्दर्शक अखिल देसाई यांनी भाष्य केलं आहे. चित्रपटात एकूण ४ गाणी असून, चित्रपटाला भरत सिंग यांचे संगीत लाभले आहे.

येत्या १५ मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Back to top button