Ramayana : साई पल्लवी-रणबीरच्या ‘रामायण’ची यादिवशी होणार घोषणा | पुढारी

Ramayana : साई पल्लवी-रणबीरच्या 'रामायण'ची यादिवशी होणार घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर चित्रपट ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाची घोषणा रामनवमीला होणार आहे. (Ramayana) नितेश तिवारी यांनी या कास दिनी अधिकृत घोषणा होणार असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार, रामायणची टीम रामनवमी च्या औचित्याने औपचारिक घोषणा करण्याची नियोजन करत आहेत. ही शुभ तिथी १७ एप्रिल, २०२४ रोजी असणार आहे. (Ramayana)

पुढील वर्षी रिलीज होणार रामायण

रामायणची शूटिंग या महिन्यात मुंबईतून सुरू केले जाईल. यानंतर टीम लंडन जाणार असल्याचे समजते. यामध्ये सनी देओल भगवान हनुमानची भूमिका साकारेली. तर यश रावणच्या भूमिकेत असेल. कैकेयी म्हणून अभिनेत्री लारा दत्ता आणि रावणच्या बहिणीची सूर्पनखाची व्यक्तीरेखा रकुल प्रीत सिंह साकारेल. रामायणची शूटिंगचा मोठा भाग मार्च ते जुलैच्या दरम्यान होईल. इतकचं नाही तर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज करण्याचे नियोजित अशल्याचे समजते.

रामायण’चे शूटिंग संपल्यानंतर रणबीर कपूर-आलिया भट्ट, विक्की कौशल सोबत ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग सुरू करेल. त्याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करतील.

Back to top button