Pooja Sawant-Siddesh Wedding : पूजा-सिद्धेश झाले एकमेकांचे सोबती, बहिण रुचिराचा लूक व्हायरल | पुढारी

Pooja Sawant-Siddesh Wedding : पूजा-सिद्धेश झाले एकमेकांचे सोबती, बहिण रुचिराचा लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी रोजी झाला. (Pooja Sawant-Siddesh Wedding) यावेळी मराठी इंडस्ट्रीतील तमाम कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली. (Pooja Sawant-Siddesh Wedding)

प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान, अभिजित खांडकेकर-सुखदा, वैभव तत्ववादी, अंकूश चौधरी, मृण्मयी देशपांडे, समीर चौघुले, वैदेही परशुरामी उपस्थित होते. तर अमोल कोल्हे यांनी कुटुंबासह हजेरी लावली.

प्रार्थना-वैदेही

दरम्यान, पूजाची बहिण रुचिरा हिचादेखील नऊवारीतील लूक समोर आला आहे. यावेळी पूजाची आई खूप भावूक झालेली दिसली. रिसेप्शन पार्टीलादेखील कलाकारांनी हजेरी लावली.

रुचिरा-पूजाची आई

पूजाने लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला लाल रंगाची साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने आणि मोकळे केस असा लूक केला होता. सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी उखाणेही घेतले.

अभिजित-सुखदा आणि मृण्मयी

 

Back to top button