

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांत लवकरच 'वेट्टियाँ' चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत लवकरच साजिद नाडियादवालासोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी नुकतेच या सुपरस्टारसोबत काम करण्याचे जाहिर केले आहेत. साजिद आणि रजनीकांत यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. साजिद यांनी रजनीकांतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे
साजिद नाडियादवाला यांनी अलीकडेच एक्सवर रजनीकांत यांच्यासोबतचा एक चित्रपट शेअर केला आहे. साजिदने फोटो शेअर करत लिहिले, 'महान रजनीकांत सरांसोबत काम करणे हा खरा सन्मान आहे, आम्ही या प्रवासात पुढे जाण्याची तयारी करत असताना उत्साह वाढत आहे.'
त्यांच्या टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, 'प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत हे मोठे सहकार्य आहे. हे दोन दिग्गज एकत्र येण्याची शक्यता आणि उत्सुकता वाढत आहे. चाहते साजिद यांच्या पोस्टवर कॉमेंट करत आगामी प्रोजेक्टसाठी अभिनंदन करत आहेत.
रजनीकांत हे 'लाल सलाम' चित्रपटात दिसले होते. साजिद नाडियादवाला यांचे 'चंदू चॅम्पियन' आणि 'हाऊसफुल ५' हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.