Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ? | पुढारी

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा लहान मुलगा अनंतचे प्री वेडिंग सोहळा १ ते ३ मार्च गुजरातच्या जामनगर येथे होणार आहे. या इव्हेंटमध्ये इंटरनॅशनल स्टार्स उपस्थित राहतील. अनंत-राधिका मर्चेंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन कार्ड समोर आले आहे. तीन दिवसीय इवेंटमध्ये प्रत्येक दिवशी होणारे सेलिब्रेशनचे डिटेल शेअर करण्यात आली आहे. Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding ) १ मार्चचा इवेंट आहे ‘अॅन ईव्हनिंग इन एवरलँड’. या फंक्शनचा ड्रेस कोड इलीगेंट कॉकटेल आहे. या मॅजिकल वर्ल्डमध्ये म्युझिक, डान्स, व्हिज्युअल आर्टिस्ट्री आणि स्पेशल सरप्राईजने गेस्ट्स एंटरटेन होतील. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding )

जंगल थीमवर आधारित सोहळा

२ मार्चला थीम वाईल्ड लाईफची आहे. त्या दिवसाची थीम आहे ‘अ वॉक ऑन द वाईल्डसाईड. येथे पाहुण्यांना वंतारा रेस्कयू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये वेगळा अनुभव मिळेल. या दिवसाचे फंक्शन सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहिल. ड्रेस कोड – जंगल फीवर.

३ मार्चला मेळावा ठेवण्यात आला आहे. गाणी आणि डान्स सायंकाळी ७.३० वा. सुरु होईल. या कार्निव्हलसाठी गेस्ट्सचे ड्रेस कोड डॅजलिंग देसी रोमान्स ठेवण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता राधा कृष्ण मंदिररात हस्ताक्षर इवेंट आहे. या फंक्शनचे ड्रेस कोड हेरिटेज इंडियन आहे.

पार्टीची शान बनणार ग्लोबल स्टार

प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये पॉप स्टार रिहाना, दिलजीत दोसांझ परफॉर्म करतील. बिल गेट्स, इवांका ट्रम्पसारखे दिग्गज देखील अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग बॅशचा हिस्सा बनणार आहेत. संपूर्ण जामनगर १ ते ३ मार्च पर्यंत सेलिब्रेशन करताना दिसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Ambani (@mukeshambani304)

असा असेल जेवणाचा बेत

इंदौरचे ६५ शेफ बोलावण्यात आले आहेत. हे शेफ इंदौरी चवीचे पदार्थ पै-पाहुण्यांना खाऊ घालतील. सराफा चौपाटी आणि ५६ दुकानांच्या पदार्थांची चव निराळीच आहे.

सराफा काउंटर

माहितीनुसार, अनंत अंबानीच्या लग्नाआधी होत असलेल्या सोहळ्यात इंदौरची चव पैहुण्यांना चाखवण्यासाठी इंदौरचा एक स्पेशल सराफा काऊंटर देखील तिथे उघडले जाईल. मिठाई, नमकीन, चटपटे आयटम असतील. इंदौरी कचौरी, मक्याचे कीस, खोपरा पेटिस, उपमा आणि इंदौरी पोहा जलेबीचा समावेश आहे.

२५०० हून अधिक व्यंजन

मीडिया रिपोर्टनुसार, जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी तीन दिवसात १२ हून अधिक जेवणाचे प्रकार आणि २५०० हून अधिक प्रकारचे व्यंजन दिले जाईल. ज्या टीम्स रवाना झाल्या आहेत, तयात २० महिला शेफदेखील आहेत. मसाले इंदौरहून मागवण्यात आले आहेत.

पदार्थांमध्ये असेल हे खास

थाई, मेक्सिकन, जॅपनीज, पॅन एशियन फूड आयटम, पारसी भोजन थाळी तयार केली जाईल. २२५ हून अधिक पदार्थ लंचमध्ये, २७५ प्रकारचे व्यंजन डिनरमध्ये, ७५ प्रकारचे व्यंजन नाश्तामध्ये आणि ८५ प्रकारचे आयटम मिड नाईट मीलमध्ये असेल. मिड नाईट मील रात्री १२ ते सकाळी ४ वाजेपर्यंत असेल.

video- mukeshambani304 insta वरून साभार 

Back to top button