Lockdown Lagna मध्ये प्रीतम कागणे-रमेश परदेशी भाऊ-बहिणीच्या भूमिकेत | पुढारी

Lockdown Lagna मध्ये प्रीतम कागणे-रमेश परदेशी भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली आहे. लॉकडाऊन लग्न हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.

रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटात ते पहिल्यांदाच भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते. त्या दरम्यान काय धमाल होते, याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Back to top button