Sonu Sood : रेस्टॉरंटमध्ये ती चिठ्ठी हाती आली अन्‌ सोनू सूदने… | पुढारी

Sonu Sood : रेस्टॉरंटमध्ये ती चिठ्ठी हाती आली अन्‌ सोनू सूदने...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता- समाजसेवक परोपकारी सोनू सूदने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर हँडलवर एका (Sonu Sood) चाहत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय. त्याने एक खास गोष्ट शेअर केली. या सगळ्या कृत्याने सोनू अगदीच भावूक झाला आणि त्याने हा सगळा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Sonu Sood)

चाहत्याने त्याचा साठी लिहिलेल्या खास चिठ्ठी चा स्नॅपशॉट शेअर करून त्याला कॅप्शन दिले की, “हे कोणी केले हे मला माहीत नाही. पण एका रेस्टॉरंटमध्ये आमच्या रात्रीच्या जेवणाचे संपूर्ण बिल कोणीतरी दिले आणि ही गोड चिठ्ठी सोडली. या कृत्याने अगदीच मी भावूक झालो आहे. ❤ धन्यवाद मित्रा❤🙏”

सोनू सूदला त्याच्या चाहत्यांकडून सतत पाठिंबा मिळत असतो. चाहते सोनू साठी कायम काही न काहीतरी करत असतात आणि अशातच ही गोष्ट सोनूच्या मनाला भावून गेली. इंडियन क्रिएटिव्ह युनिटीने अजितवाल मोगा येथे १.१७ लाख चौरस फुटांवर सोनूसाठी एक उल्लेखनीय पॉप आर्ट मास्टरपीस केला होता. याव्यतिरिक्त एका समर्थकाने देशभरातील चाहत्यांमध्ये एकता आणि दयाळूपणा वाढवण्यासाठी “मैं भी सोनू सूद मोहीम” सुरू केली. सोनू सूदच्या मानवतावादी उपक्रमांचा भारतातील लोकांवर आणि चाहत्यांवर कसा मोठा प्रभाव पडला आहे, ही याची उत्तम उदाहरणे आहेत.

सायबर क्राईम थ्रिलर ‘फतेह’मध्ये सोनू रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. वर्क फ्रंटवर झी स्टुडिओज आणि सूदची निर्मिती कंपनी शक्ती सागर प्रॉडक्शन सह-निर्मिती आहे. या चित्रपटात सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.

Back to top button