Suhani Bhatnagar Passes Away : ‘दंगल गर्ल’ सुहानीची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, १९ व्या वर्षी निधन

अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये बबिता फोगटच्‍या  बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले.
अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये बबिता फोगटच्‍या  बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये बबिता फोगटच्‍या  बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले. तिच्‍यावर गेल्या काही दिवसांपासून फरिदाबादमध्ये उपचार सुरू होते. (Suhani Bhatnagar Passes Away) सुहानीच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुहानीने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या दंगल चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात तिने बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारली होती. (Suhani Bhatnagar Passes Away )

Suhani Bhatnagar Passes Away : चुकीच्या उपचारांमुळे सुहानीचा मृत्यू!

सुहानी भटनागर फरिदाबादच्या सेक्टर 17 मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती.प्राथमिक माहितीनुसार, चुकीच्या उपचारांमुळे सुहानी भटनागरचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारासाठी ती घेत असलेल्या औषधांच्या रिॲक्शनमुळे सुहानीची तब्येत आणखीनच खालावली होती.  शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी तिचा मृत्यू झाला. सुहानीच्या पार्थिवावर आज (दि.१८) सेक्टर-15 फरीदाबाद येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तू नेहमीच स्टार राहशील : आमिर खान

सुहानीच्या निधनानंतर आमिर खान याने आपल्या सोशल मीडियावर लिहिले आहे की, "सुहानीच्या निधनाच्या बातमीने आम्ही दु:खी आहोत.संपूर्ण कुटुंबाप्रती आम्ही शोक व्यक्त करतो. सुहानी खूप हुशार मुलगी होती, ती नेहमीच टीम प्लेयर म्हणून काम करायची. सुहानी तू नेहमी आमच्या हृदयात एक तारा राहशील."

अभ्यासामुळे चित्रपटांतून ब्रेक घेतला

सुहानीला दंगल चित्रपटातील भूमिकेने एक ओळख मिळवून दिली होती. या चित्रपटाशिवाय ती काही टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली होती. मात्र, नंतर तिने कामातून ब्रेक घेऊन अभ्यास पूर्णवेळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र चुकीच्या उपचारांमुळे सुहानीचा आकस्‍मिक मृत्यू झाला.

दंगल हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'दंगल' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. दंगलने जागतिक बॉक्स ऑफिसवर 2,023 कोटी रुपयांची कमाई करून इतिहास रचला होता. नितेश तिवारी दिग्दर्शित  चित्रपटात आमिर खानने कुस्तीपटू महावीर फोगटची भूमिका साकारली होती. तर सुहानी भटनागरने महावीर यांची धाकटी मुलगी बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news