72nd National Film Awards : 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट;७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

'आर्टिकल ३७०' चित्रपटाने पटकावला 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'चा पुरस्कार
72nd National Film Awards
72nd National Film Awards Pudhari
Published on
Updated on

72nd National Film Awards

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सन २०२४ साठीच्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली. परेश मोकाशी दिग्दर्शित 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला, तर 'आर्टिकल ३७०' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'चा पुरस्कार जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'श्रीकांत'

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'श्रीकांत' या चित्रपटाला जाहीर झाला. 'भंगार' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म' आणि 'राम-नामी' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट माहितीपट' (डॉक्युमेंटरी) पुरस्कार जाहीर झाला.

72nd National Film Awards
Goa Marathi Film Festival | 'बंडखोर 'ने उघडणार गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा
72nd National Film Awards
72nd National Film Awards

गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ममूटी आणि कार्तिक आर्यन 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'

'आर्टिकल ३७०' मधील अभिनयासाठी यामी गौतमला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला, तर ममूटी ('ब्रह्मयुगम') आणि कार्तिक आर्यन ('चंदू चॅम्पियन') यांनी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार संयुक्तपणे पटकावला. रणदीप हुड्डाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' पुरस्कार जाहीर झाला. हे पुरस्कार फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष जयराज, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष असीम सिन्हा आणि चित्रपटविषयक लेखन ज्युरीचे अध्यक्ष ए. चंद्रशेखर यांनी जाहीर केले.

72nd National Film Awards
IFFI 2025 |‘मेराकी बाय द सी‌’ मधून मिळतो सकारात्मकतेचा संदेश

72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: राजकुमार पेरियासामी (अमरन)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रूपश्री वरकाडी (मिथ्या), सचन नमिदास (महाराजा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा (भक्षक)

सर्वोत्कृष्ट संपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट: कल्की २८९८ एडी

राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्तम चित्रपट: कॅप्टन मिलर

सर्वोत्कृष्ट बालकलाकार: रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब, गीताश्री चक्रवर्ती, अरुंदैव पोथुला, अतिश एस. शेट्टी

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: ब्रह्मयुगम (शेहनाद जलाल)

सर्वोत्कृष्ट पटकथा: पुष्पा २ (सुकुमार)

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: लकी भास्कर (वेंकी अट्लुरी)

72nd National Film Awards
Pune Short Film Festival: पुणे लघुपट महोत्सवात ‘आगमन’ सर्वोत्तम लघुपट; विविध विभागांत विजेत्यांची घोषणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news