

विठ्ठल गावडे पारवाडकर
पणजी ः यंदाच्या इफ्फीमध्ये गोव्यातील 17 चित्रपटांच्या प्रवेशिका सादर केल्या गेल्या होत्या. त्यातील पाच लघुचित्रपटांची निवड झाली होती. यातील पाचवा लघुचित्रपट मिराकी बाय द सी इफ्फीत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटांमधून सकारात्मकता ठेवून कोणतेही कार्य तडीस नेत यथ मिळवता येते, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा चित्रपट विविध पारंपरिक उत्सवाचे जतन करण्यासाठी काम करणारे मारियोस फर्नांडिस (फेस्ताकार) यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांचे जीवन मुलाखतीच्या रुपात इंग्रजी संवादातून दाखवण्यात आले आहे. हा लघुचित्रपट गोव्यात फेस्ताकार म्हणून ओळखले जाणारे फर्नांडिस यांचे जीवनपट दाखवतो. त्यांनी राज्याची समृद्ध संस्कृती, खाद्यपदार्थ, नाट्य आणि परंपरा रक्षणासाठी आत्तापर्यंत सरकारची किंवा कुणाची मदत न घेता आयोजित केलेल्या 99 परंपरिक व लोवाद्य आणि लोकसंस्कृती जतनाच्या कार्यक्रमाची माहिती देतो. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दोन दशकांपूर्वी गोव्यात परतल्यानंतर, त्यांनी उत्सवाचे रूपांतर जागरूकता, हास्य आणि एकता प्रदान करणाऱ्या सेवेत केले. त्याच्या उत्साही भावनेतून लघुचित्रपट फुललेला आहे. उदारता, सर्जनशीलता आणि आनंदाने जास्त खर्च न करता कार्यक्रमन कसे आयोजित करता येतात. प्रमुख पाहुणे, बक्षिसे, स्पर्धा व मोठे मंच नसतानाही कार्यक्रम होतात, हा सकारात्मक विचार यातून दिसतो. या लघुचत्रपटाचे दिग्दर्शन हिमांशु सिंग यांनी केले असून निर्मिती व लघुचित्रपटात भुमिका डॉ. ग्लेंडोलोनो दे ओर्नेलास यांनी केली आहे.