Bhakshak Trailer: मुलींवरील अत्याचाराविरुद्ध लढायला आली भूमी पेडणेकर (Video) | पुढारी

Bhakshak Trailer: मुलींवरील अत्याचाराविरुद्ध लढायला आली भूमी पेडणेकर (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भूमी पेडणेकरचा चित्रपट ‘भक्षक’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Bhakshak Trailer) यामध्ये अभिनेत्री भूमी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंगावर शहारे येतील. ती मुलींवर होणाऱ्या अत्याराविरोधात आवाज उठवताना दिसणार आहे. परंतु, या लढाईमध्ये खूप मोठ्या अडचणी यमोर येतात. पण, भूमी आपल्या तापट स्वभावामुळे हार मानत नाही. पण, समाजाला प्रश्न उपस्थित करते की, ‘काय आता तुम्ही यांना माणसांमध्ये मोजणार आहात? यांनी स्वत:ला भक्षक मानले आहेत…?’ (Bhakshak Trailer)

संबंधित बातम्या –

ट्रेलरची सुरुवात एक मार्मिक दृश्याने होते. एका बालिकागृहाच्या अंधाऱ्या खोलीत निष्पाप मुली बसल्या आहेत आणि एक ‘भक्षक’ त्यांना म्हणतो, ‘अनाथाचा अर्थ कळतो का? ज्याचा कुणी नाथ असत नाही. तुम्ही लोक आहात की नाही, कुणालाही माहिती नाही.’

या चित्रपटामध्ये संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव देखील आहेत. संजय मिश्रा भूमीच्या संघर्षात तिला पाठिंबा देतो. पावलापावलांवर अडचणी आणि धमकीविरोधाता भूमी न्यायाची लढाई लढताना दिसते. प्रमाणिकपणे काम करणाऱ्या आणि समाजातील वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी ते अपमानापर्यंत किती काही अडचणींना तिला सामोरे जावे लागते, हेदेखील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येईल. शाहरुख खान-गौरी खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत चित्रपट ‘भक्षक’चे दिग्दर्शन पुलकितने केलं आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा निर्माते आहेत.

 

Back to top button