Munawar Faruqui : बिग बॉस-१७ जिंकल्यानंतर लगेच वाढदिवसाचा जल्लोष | पुढारी

Munawar Faruqui : बिग बॉस-१७ जिंकल्यानंतर लगेच वाढदिवसाचा जल्लोष

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ चा विजेता स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. मुनव्वरने अभिषेक कुमारला हरवून बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. तर अभिषेक कुमार या शो चा फर्स्ट रनरअप ठरला. २८ जानेवारी रोजी बिग बॉस १७ चा फिनाले झाला. (Munawar Faruqui) त्याच दिवशी मुनव्वरचा वाढदिवस देखील होता. शो जिंकल्यानंतर मुनव्वरने खास अंदाजात आपला वाढदिवस साजरा केला. आणि त्याने फॅन्सचे आभारदेखील मानले. (Munawar Faruqui)

संबंधित बातम्या – 

रिपोर्टनुसार, मुनव्वरला ट्रॉफीसोबत ५० लाखांचा प्राईज मनीदेखील मिळाली. सोबतच हुंडईची नवी क्रेटा कारदेखील मिळेल. मुनव्वर फारुकीसाठी ही दुहेरी आनंदाची गोष्ट होती. कारण, फिनाले दिवशी मुनव्वर फारुकीचा वाढदिवसदेखील होता. (२८ जानेवारी)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुनव्वरला केक कट करताना पाहू शकतो. त्याचे केक कापतानाचा कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुनव्वर ब्लॅक आऊटफिटमध्ये खूप हँडसम दिसत आहे. त्याने केक कापून आपल्या मित्रांना खाऊ घातले. मुनव्वरने या खास दिनी गिफ्टदेखील दिलं, जे खूप आठवणीतील बनलं आहे.

बिग बॉसने मुनव्वर आणि अभिषेकशी बातचीत केली त्यावेळी दोघेही भावूक झालेले दिसले. मुनव्वर आणि अभिषेक दोघेही आपले अश्रू रोखू शकले नाहीत. यावेळी अभिषेकचे वडील खूप भावूक झाले. अखेरच्या क्षणी अभिषेकने बिग बॉस माफी मागितली. तर मुनव्वरने आभार मानले आणि म्हणाला की-थँक्यू बिग बॉस एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी. बिग बॉस टॉप २ च्या घोषणेनंतर १० मिनिटांसाठी वोटिंग लाईनदेखील उघडली होती. फॅन्सनीदेखील मुनव्वरला चांगले वोट दिले.

Back to top button