सहकुटुंब सहपरिवार मालिकेतली अंजी झळकणार अबोली मालिकेत | पुढारी

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतली अंजी झळकणार अबोली मालिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या सहकुटुंब-सहपरिवार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अबोली मालिकेत कोमलची एण्ट्री होणार असून मनवा हे पात्र ती साकारणार आहे. मनवाला नाईलाजाने देहविक्रेय व्यवसायात उतरावं लागलं. याविषयी तिच्या मनात सल आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये असं तिला वाटतं. अबोलीच्या पुढाकारामुळे मनवाचा शिंदे कुटुंबात प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे. मनवाचं शिंदे कुटुंबासोबत नेमकं काय नातं आहे हे देखिल मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या –

अबोली मालिकेतल्या मनवा पात्राविषयी सांगताना कोमल कुंभार म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारते आहे. लूकही खूप वेगळा आहे. अंजीप्रमाणेच मनवाही ठसकेबाज आहे. अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचाही आनंद आहेच. सहकुटुंब सहपरिवारमधील अंजीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. अबोली रात्री १०.३० वाजता पाहता येणार आहे.

Back to top button