Secrets of The Buddha Relics : डिस्कव्हरीवर पाहता येणार ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’ | पुढारी

Secrets of The Buddha Relics : डिस्कव्हरीवर पाहता येणार 'सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स'

पुढारी ऑनलाईन डेस्क : गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत. (Secrets of The Buddha Relics) या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी सीक्रेट फ्रँचायजीचा तिसरा भाग आणला आहे. ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,’ डिस्कव्हरी चॅनलवर २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होईल. अभिनेता मनोज वाजपेयी या डॉक्युमेंटरीला होस्ट करेल व त्यामध्ये दर्शकांना बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल नवीन माहिती मिळेल. (Secrets of The Buddha Relics)

संबंधित बातम्या – 

सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्सबद्दल बोलताना कलाकार मनोज वाजपेयीने म्हटले, “नीरज पांडेंसोबत काम करणे हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो व डॉक्युमेंटरीला वेगळा आकार देणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून नेहमीच मिळतात. ही डॉक्युमेंटरी दर्शकांना नक्कीच बुद्धांच्या काळात घेऊन जाईल आणि त्यांचे जीवन व शिकवण ज्या काळात होती, त्या ऐतिहासिक काळाचे दर्शन घडवेल.”

शोजचे निर्माता नीरज पांडे यांची निर्मिती असलेल्या या डॉक्युमेंटरीमध्ये गौतम बुद्धांच्या शेवटच्या दिवसांभोवती असलेल्या रहस्यांना आणि आधुनिक काळात बौद्ध धर्मामध्ये केंद्रस्थानी असलेल्या असलेल्या अवशेषांच्या रहस्याला उलगडले जाईल. त्यामध्ये या अवशेषांच्या मागे असलेले त्यांचे मूळ, सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामागे असलेल्या अध्यात्मिक कहाण्या यांचा शोध घेतला जाईल.

Back to top button