Bade Miyan Chote Miyan : दोन ॲक्शन स्टार अक्षय- टायगरचा येतोय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ | पुढारी

Bade Miyan Chote Miyan : दोन ॲक्शन स्टार अक्षय- टायगरचा येतोय 'बडे मियाँ छोटे मियाँ'

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा ॲक्शन सुपरस्टार म्हणजे, अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या २०२४ मधल्या पहिल्या रिलीजसाठी सज्ज होत आहे. २०२४ च्या ईदला रिलीज होणार्‍या “बडे मियाँ छोटे मियाँ” ( Bade Miyan Chote Miyan ) मध्ये अक्षय कुमारसह तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या आगामी “बडे मियाँ छोटे मियाँ” ( Bade Miyan Chote Miyan ) चित्रपटातील एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये टायगर- अक्षय दोघेजण पायलटच्या वेशभूषेत डोळ्यांना चष्मा परिधान करून उभे असलेले दिसत आहेत. याशिवाय दोघांच्या पाठिमागे एक विमान दिसत आहे.

अक्षयने यावेळी खास करून दोन्ही हाताची घडी घातलीय. तर टायगरने त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘“बडे और छोटे से मिलने का समय हो गया है, और कम बस #3MonthToBadeMiyaan-ChoteMiyaan’. असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोवर अनेक चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. या फोटोला आतापर्यत ६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. बॉलिवूडचा ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ हा नव्या रुपात दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ आणि सिद्धार्थ आनंदचा मार्फ्लिक्स पिक्चर्सचा ‘रॅम्बो’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button