Sidharth Malhotra Birthday : 'हॅपी बर्थडे माय लव्ह...' म्हणत कियाराचं सिद्धार्थसोबत लिपलॉक (video) | पुढारी

Sidharth Malhotra Birthday : 'हॅपी बर्थडे माय लव्ह...' म्हणत कियाराचं सिद्धार्थसोबत लिपलॉक (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज १६ जानेवारी २०२४ रोजी त्याचा ३९ वा वाढदिवस ( Sidharth Malhotra Birthday ) मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या खास दिवसाच्यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची पत्नी कियारा आडवामीने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत लिपलॉक केलं आहे. या ढटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

सिद्धार्थचा ३९ वा वाढदिवस ( Sidharth Malhotra Birthday ) त्याच्या मित्रपरिवाराने खास बनवला आहे. बॉलीवूडमधील त्याचे काही जवळचे मित्र काल रात्रीच सिद्धार्थच्या घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. तर काही नातेवाईक आणि प्रियजन आधीच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सिद्धार्थची पत्नी कियारानेही त्याला रात्री रोमॅन्टिक मूडमध्ये किस करत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडिओसोबत कियाराने ‘हॅपी बर्थडे माय लव्ह…’ असे लिहिले आहे. यात सिद्धार्थ आणि कियारा लिप लॉक करताना दिसत आहेत. यासोबत कियाराने दोघांचे काही रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. तसेच सिद्धार्थ घराबाहेर निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि शकुन बत्राही दिसले आहेत. कियाराने इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थसोबतची रोमँटिक झलक शेअर केली आहे. यावेळी बर्थडे बॉय सिद्धार्थ खूप आनंदी असून त्याने रंगीबेरंगी टी-शर्ट परिधान केलाय. तर कियारा ब्लॅक ड्रेसमध्ये कूपच ग्लॅमरस दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याला कॉमोन्टस करताना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​’इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९ जानेवारीला ओटाटीवर प्रदर्शित होणार आहे. यात सिद्धार्थसोबत बलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय देखील दिसणार आहेत.

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button