Agastya Nanda : अगस्त्यला गार्डने समजले होते डिलिव्हरी बॉय ! | पुढारी

Agastya Nanda : अगस्त्यला गार्डने समजले होते डिलिव्हरी बॉय !

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगस्त्य नंदा ( Agastya Nanda ) अभिनेता झाला यामध्ये आश्चर्य मानण्याचे कारण नाही. याचे कारण म्हणजे बॉलीवूडमधील दोन बड्या घराण्यांचे रक्त त्याच्या धमन्यांमधून वाहत आहे. राज कपूर यांची कन्या रितू नंदा यांचा नातू आणि अमिताभ बच्चन- जया बच्चन यांची कन्या श्वेता हिचा मुलगा असलेला अगस्त्य ‘द आर्चीज ‘मधून चित्रपटसृष्टीत आला आहे.

संबंधित बातम्या 

पहिल्या चित्रपटातील त्याच्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले असले तरी पोरसवदा दिसणाऱ्या अगस्त्यला बरीच मजल मारावी लागेल, असेही काहींना वाटते. अर्थात, शाहिद कपूर चित्रपटात आला त्यावेळी तोही असाच दिसत होता! स्वतः अगस्त्यने एका मुलाखतीत आपल्या या लूकशी निगडित एक मजेशीर किस्सा सांगितला. ‘द आर्चीज’ मिळण्याआधी तो निर्माते- दिग्दर्शकांना भेटत होता त्यावेळेचा हा किस्सा आहे,

तो एका ऑफिसमध्ये गेला असता तेथील सिक्युरिटी गार्डला वाटले की, तो एक डिलिव्हरी बॉय आहे! त्याने ‘इधर आ, नाम लिख, पॅकेज डिलिव्हरी टाईम बता’ असे म्हटले! त्यावर अगस्त्यने त्याला ‘मैं यहाँ पॅकेज देने नही आया हूँ, डायरेक्टर से मिलने आया हूँ’ असे सांगितले. त्यावरही गार्डचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याने ‘झूठ मत बोल’ असेही म्हटले! अखेर त्याचा विश्वास बसला आणि अगस्त्यला आत जाता आले. ( Agastya Nanda )

Back to top button